*कोकण Express*
*▪️माझ्या सिंधुदुर्गातील एका जरी एसटी कामगारांचे निलंबन केलात तर याद राखा*
*▪️एसटी कामगारांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट
*▪️केलेली कारवाई तातडीने मागे घ्याण्याच्या आम.राणे यांनी दिल्या सूचना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गरीब एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करून भीती दाखबिण्याचे प्रकार थांबवा.माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जरी एसटी कामगारांचे निलंबन केलात तर याद राखा.ज्या कर्मचाऱ्यांचे नावे निलंबनाची आदेश केलात ते रद्दबातल करा.शांततेत संप सुरू आहे, कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहे त्याला डीवचू नका.सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला.एसटी कामगारांनी भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवलीत ओम गणेश निवस्थानी भेट घेतली असता एसटीचे विभाग नियंत्रक प्रशाक रसाळ यांना फोन करून समज दिली आणि यापुढे निलंबनाची भीती कामगारांना घालू नका असे सांगितले.
आपल्या न्याय हक्कांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा शांततेत सुरु असलेल्या संपला महामंडळाचे अधिकारी गालबोट लावत असल्याचे आज उघड झाले.या पूर्वी १७ तर आज ८ अशा २५ एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित करण्याचे आदेश विभागनियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिले.दरम्यान एसटी कामगारांनी ओंगणेश निवस्थानी जात भाजपा आमदार नितेश राणे यांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली असता आमदार नितेश राणे यांनी विभाग नियंत्रकांना फोन करून कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याच्या सूचना केल्या.एसटी कामगारांना धीर देत अशा निलंबन आदेशाला भीक घालू नका.आपल्या भूमिकेवर ठाम राहा. भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी आहे.या लढा हक्क मिळवूनच यशस्वी होईल असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या सह एसटी कामगारांचे प्रतिनिधी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

