*कोकण Express*
*विधानसभा विशेषाधिकार समितीवर आमदार नितेश राणे*
महाराष्ट्र राज्य विधानसभा विशेषाधिकार समितीवर कणकवली-देवगड-वैभववाडी चे भाजापा आदर नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे.विधानसभा सभागृहात आजपर्यंत अनेक प्रश्न मुद्देसूद उपस्थित करून आमदार श्री राणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधलेले आहे.अभ्यासू आमदार म्हणून आमदार नितेश राणे यांनी उमटवलेल्या ठशामुळे १५ आमदारांच्या या समितीत त्यांची निवड झाली आहे.विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी ही यादी मंजूर केली असून विधान मंडळाच्या उपसचिवांनी ती जाहीर केली आहे.
या समितीवर भाजपचे माजी राज्यमंत्री आदार रवींद्र चव्हाण,आम. अतुल भातखळकर, आम.अमित साटम,आम.अभिमन्यू पवार या आमदारांची सुद्धा निवड केली आहे.सभागृहात येणाऱ्या हक्कभंग प्रस्थावावर ही समिती प्रामुख्याने काम करणार आहे.
