*कोकण Express*
*करमाळी-नागपूर रेल्वे फेरी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी*
करमाळी-नागपूर रेल्वेसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आल्याने ही रेल्वे सेवा २० नोव्हेंबर नंतरही पुढे कायम सुरू ठेवावी, अशी प्रवासी वर्गाकडून मागणी केली जात आहे. ही रेल्वे फेरी प्रवाशांना उपयुक्त ठरते. २० नोव्हेंबरनंतर कायमस्वरूपाची मंजुरी या रेल्वे फेरीला देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी समन्वयकांकडून वारंवार केली जात आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने या रेल्वेसवेला चांगला प्रतिसाद मिळत असून थांबे वाढवावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष सुनील उत्तेकर, सभासद वैभव बहुतुले, पेण तालुकाध्यक्ष हर्षद भगत, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, प्रवासी मित्र सुधीर राठोड, मनोज चव्हाण, गजानन राठोड यांनी केली आहे.