जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत सिंधुदुर्गनगरीत 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धांचे आयोजन!

जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत सिंधुदुर्गनगरीत 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धांचे आयोजन!

*कोकण Express*

*▪️जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत सिंधुदुर्गनगरीत 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धांचे आयोजन!*

*▪️कोरोना संकटानंतर प्रथमच कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल च्या जिल्हास्तरीय स्पर्धा रंगणार..*

*कासार्डे ः संजय भोसले*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य पुणे अंर्तगत,जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 वर्षाखालील जिल्हास्तरीय 4 थ्या खेलो इंडिया गेम्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय 4 थ्या खेलो इंडिया गेम्स क्रीडा स्पर्धाचे आयोजन पूढीलप्रमाणे करण्यात आले आहे.
दि.24/11/2021 रोजी
18 वर्षाखालील मुले,व
दि.25/11/2021 रोजी
18 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तर दि,-26/11/2021रोजी 18 वर्षाखालील मुलांच्या तर,दि.27/11/2021 रोजी १८वर्षाखालील मुलींच्या खोखो स्पर्धा संपन्न होणार आहेत.
या दोन्ही स्पर्धेचे ठिकाण जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग (सिंधुदुर्गनगरी) असणार आहे.
यानंतर दि.30/11/2021 रोजी१८वर्षाखालील मुलींची बास्केटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होणार आहे.
वरील दिलेल्या खेळामधील आयोजनाच्या सुचना पुढीलप्रमाणे कबड्डी, खो-खो व बास्केटबॉल या खेळाकरीत खेळाडूची जन्मतारीख
दि.01/01/2003 रोजीची किंवा त्यानंतरची असावी.तसेच खेळाडू सोबत आधारकार्ड, 10 वी बोर्ड प्रमाणपत्र,व जन्मतारीख पुरावा असणे आवश्यक आहे.
कबड्डी या खेळाकरिता खेळाडूचे वजन 18 वर्षाखालील मुलांसाठी- 70 किलो खालील व 18 वर्षाखालील मुलींचे – 65 किलोखालील असणे आवश्यक आहे.
कबड्डी या खेळासाठी वजन स्पर्धेपुर्वी एक तास अगोदर घेण्यात येईल याची नोंद खेळाडू ,शिक्षक व प्रशिक्षकांनी घ्यावी.
तरी जिल्हयातील शाळा/महाविद्यालये/क्रीडा मंडळे (क्लब) यांचे संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता खेळाडूंनी उपस्थितीत रहावे. विशेष म्हणजे शाळाबाहय खेळाडूंनाही जिल्हास्तरीय निवडचाचणीसाठी संधी दिली जाणार आहे.अधिक माहितीसाठी नानकसिंग बस्सी क्रीडा अधिकारी -मोबा- 9421643359 यांच्याशी संपर्क साधावा.
तरी जास्तीत जास्त स़घांनी या स्पर्धेला उपस्थितीं दर्शवावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.विजय शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!