*कोकण Express*
*▪️श्री भैराईदेवी ट्रस्टच्या अध्यक्षपदी शैलेंद्र राणे तर सचीव म्हणून शरद घाडी यांची निवड*
*▪️ट्रस्टच्या निकाला नंतर पहीली वहीली कार्यकारिणी जाहीर*
*कासार्डे ः संजय भोसले*
मोंड येथील श्री भैराईदेवी आणि इतर देवस्थान ट्रस्टची ग्रामसभा देवीच्या मंदिरात दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न झाली. या सभेत उपस्थित असलेले मानकरी आणि ग्रामस्थांनी ट्रस्टच्या कार्यकारिणीची निवड केली. श्री. शैलेंद्र राणे- अध्यक्ष, भागोजी झरकर- उपाध्यक्ष, शरद घाडी- सचिव, विश्वास जोशी-सह सचिव,अशोक मोंडे-खजिनदार तर सुनिल जोशी, जितेंद्र राणे, सुभाष अनभवणे, संजय मोंडे, दीपक राणे, शांताराम झरकर,अनाजी घाडी, बावा निकम,अभय बापट, शामसुंदर मुणगेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. एकूण१५ सदस्यांची ५ वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.