*कोकण Express*
*नाटळ व हरकुळ बुद्रुक जि. प.मतदार संघावर भगवा फडकवूया; कनेडी बाजारपेठ येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रतिपादन…*
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नाटळ व हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघावर भगवा फडकवूया आणि विरोधकांची मक्तेदारी मोडीत काढून पुढील वर्षीच्या स्मृतिदिनाला २ जिल्हा परिषद सदस्य व ४ पंचायत समिती सदस्य स्टेजवर दिसतील या पद्धतीने कामाला लागूया आणि ज्यांची कोणाची मक्तेदारी आहे त्यांची मोडीत काढण्याचा संकल्प आज करुया असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा तिरंगी सामना कनेडी ( सांगवे) बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतुल रावराणे, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, विभागप्रमुख आनंद आचरेकर, बंड्या रासम, पं. स. सदस्य मंगेश सावंत, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, युवासेनेचे गुरू पेडणेकर, भिरवंडे उपसरपंच नितीन सावंत, आनंद ठाकूर, बेनी डिसोझा, संतोष सावंत, महेंद्र डीचवलकर, सापळे मॅडम , बुवा संतोष जोईल, बुवा संदीप पुजारे, बुवा विनोद चव्हाण तसेच शिवसेना नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद आचरेकर यांनी केले.