*कोकण Express*
*निगुडे याठिकाणी कृषी विभाग क्रॉपसॅप अंतर्गत शेतीदिन साजरा करण्यात आला*
*बांदा ः प्रतिनिधी*
निगुडे येथे शेतीदिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री विश्वटी समूह व संतोषी समूह च्या शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निगुडे गावचे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, कृषी पर्यवेक्षक श्री बी गाड हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्रीमती श्वेता बेलगुंदकर यांनी केले यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री बी. गाड यांनी श्री पद्धतीने भात शेती कशी करावी, भाताचे प्रकार त्या संबंधी माहिती, वायंगणी शेती यावेळी करताना प्रात्यक्षिक करून यावेळी निगुडे येथे शेती करावयाची आहे त्याच प्रकारे शेतकरी अपघात विमा, फळबाग इन्शुरन्स, ऑरगॅनिक खते या सर्व गोष्टीची माहिती त्यांनी दिली त्यामुळे सर्वांनी शेती करावी असे मोलाचे मार्गदर्शन श्री बी. गाड यांनी केले उपस्थितांना निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आपले विचार मांडले आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो शेतीमध्ये उत्पादन, पूर्व उत्पादन आणि उत्पादनानंतर महिलांचा सहभाग मोठा आहे विशेषतः दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, फलोद्यान यामध्ये महिलाचा सहभाग उल्लेखनीय आहे ग्रामीण भागातील ७०℅ टक्के महिलांना शेती रोजगार करावा लागत असून जवळपास ६० ते ८० टक्के उत्पादनात त्यांचा वाटा असल्याचे दिसून येत आहे शेतीविषयक मार्गदर्शन व समाजात महिला शेतकरी म्हणून योग्य स्थान मिळणे महिलांना गरजेचे आहे भारतातील साधारण ३३ टक्के महिला अशा शेतकरी आहेत की ज्या स्वतःच्या शेतात शेती करतात तर ४७ टक्के महिला दुसऱ्याच्या शेतीत मजुरी ने काम करतात शेतीत पुरुषांच्या बरोबरी जरी महिला काम करत असल्या तरी महिलांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी दिली जात आहे योग्य नियोजन कष्ट करण्याची तयारी वेळेचा सदुपयोग इत्यादी बाबींमुळे महिलावर्गाचा शेतीमाल विक्री व्यवस्थेतील सहभाग वाढल्यास शेतीचे अर्थकारण बदलल्यास निश्चितपणे मोठा हातभार मिळेल महिलांनी अनेक क्षेत्रात यश संपादन करून महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे त्यामुळे आज निगुडे येथील महिला “पिकेल ते विकेल” या अंतर्गत आपला स्टॉल लावून व्यवसाय करतात ग्रामपंचायतीमार्फत जे काय सहकार्य हवे असेल ते आम्ही आपणास करण्यास तयार आहोत असे गवंडे यांनी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर निगुडे सरपंच समीर गावडे, कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर श्रीमती श्वेता सावंत, श्रीमती सुषमा देसाई, शेतीमित्र संजना गावडे, ग्रामपंचायत सदस्या समीक्षा गावडे, सी. आर. पी. ममता नाईक, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, अंगणवाडी सेविका प्रियंका राणे, दिपाली निगुडकर, शुभदा गावडे, सुरेखा राणे, गंधाली निगुडकर, लक्ष्मी पोखरे, संजना सावळ, ममता गावडे, सुमित्रा शेलटे, सुचिता नाईक, सुनिता केणी, स्नेहलता तुळसकर तसेच विश्वाटी समूह व संतोषी समूह गटाच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी कृषी सहाय्यक बेळगुंदकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.