*कोकण Express*
*▪️कुडाळ शहर भाजपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली खडी स्वरूपात दिवाळी भेट*
*▪️आमदार वैभव नाईक यांनी भूमिपूजन केलेला मे महिन्यामध्ये केलेला रस्ता जुलै महिन्यामध्ये गायब*
*▪️ठेकेदाराकडून अंदाज पत्रकाप्रमाणे पुन्हा रस्ता करून घेण्याचे लेखी स्वरुपात घेतले पत्र*
*▪️कुडाळ मालवण – कुडाळ आणि कुडाळ – बाव रस्ता ८ दिवसात काम सुरू करण्याचेही केले मान्य*
*▪️माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहराध्यक्ष राकेश कांदे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, प्रशांत राणे सुनील बांदेकर, राजेश पडते यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब*
कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला आज सार्वजनिक बांधकाम च्या अखत्यारीत असणाऱ्या शहरातील कुडाळ – मालवण, कुडाळ कॉलेजनाका ते हायवे तसेच कुडाळ – बाव रस्ता हे काम सुरू करण्याबाबत जाब विचारण्यात आला . माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तर माजी बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे बांधकाम मंत्री असते वेळी हे तिन्ही रस्ते मंजूर होते परंतु ठाकरे सरकार आल्यानंतर या रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती आणि आता पुन्हा या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली या झालेल्या विलंबाला पूर्णत: ठाकरे सरकार जबाबदार आहेत. सदर रस्ते करण्यासाठी का विलंब होत आहे या अशा वागण्यामुळे जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत असे खडे बोल सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले यावेळी
कुडाळ हायवे आर.एस.एन. ते कुडाळ कॉलेज नाका हा रस्ता मे महिन्यामध्ये केला आणि जुलै महिन्यामध्ये गायब होतो केवळ खड्डेच खड्डे उडतात अशा ठेकेदाराकडून पुन्हा त्या ठिकाणी अंदाज पत्रकाप्रमाणे काम करून घेण्याचे लेखी पत्र त्याचबरोबर उर्वरित सर्व रस्ते ८ दिवसात काम सुरू करण्याचे लेखी पत्र घेतल्याशिवाय आम्ही कार्यालयातून मागे फिरणार नाही अशी भूमिका कुडाळ शहर भाजपच्या वतीने घेण्यात आली या वेळी सदर रस्त्यांची कामे तात्काळ सुरू होण्यासाठी आणि रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना व भूमीपूजन करणार्या आमदार वैभव नाईक यांना जाग यावी या उद्देशाने दिवाळी भेट म्हणून खडी स्वरूपात भेट देण्यात आली यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहराध्यक्ष राकेश कांदे ,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, माजी सरपंच प्रशांत राणे ,माजी सभापती राजन जाधव, राजेश पडते ,विजय कांबळी, राकेश नेमळेकर, राजू बक्षी ,निलेश परब ,सुमित बांबुळकर ,विजय सावंत ,चेतन धुरी, अविनाश पराडकर, प्रसन्ना गंगावणे ,शुभम राणे तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.