*कोकण Express*
*▪️”शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य करूया”*
*▪️शिवसेना नेते संदेश पारकर यांचे शिवसैनिकांना आवाहन*
*▪️स्मृतिदिनी शिवसैनिकांनी केले बाळासाहेबांना अभिवादन*
“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत. जनतेवर होणार्या अन्यायाविरोधात लढा देणे हा शिवसैनिकांचा बाणा असून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य आपण सर्वांनी एकत्रिरित्या करूया आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवूया,” असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कणकवली येथे केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे”च्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला आघाडीप्रमुख निलम सावंत, अनिल हळदिवे, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैय्या पारकर, अॅड.हर्षद गावडे, संदेश पटेल, अनुप वारंग, भालचंद्र दळवी, शेखर राणे, राजु राणे, महिला आघाडीच्या प्रतिक्षा साटम, वैदेही गुडेकर, रश्मी बाणे, संजना कोलते, शोभा बागवे, दिव्या साळगावकर, रामु विखाळे, रुपेश आमडोसकर, विलास गुडेकर, सुशांत दळवी, ललित घाडीगांवकर, निसार शेख, बाळू मेस्त्री, रोहित राणे, रिमेश चव्हाण, दिपक गुरव, मंगेश सावंत, सुदाम तेली, महेश कोदे, बाळू पारकर, दामू सावंत, दादा भोगले, भास्कर राणे, संजय पारकर, काका राणे, अमोल राणे, प्रशांत राणे, योगेश मुंज, दया कुडतरकर, शरद सरंगले आदी शिवसैनिक उपस्थित होते.