*कोकण Express*
*स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य उपजिल्हा रुग्णालयात ब्लँकेटचे केले वाटप*
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. रूग्णांसाठी देण्यात आलेली ही मदत वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चितारी, डॉ.पांडुरंग वजराठकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अशोक दळवी, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, अब्जु सावंत, आबा सावंत, प्रतिक दळवी, योगेश नाईक, तात्या वेंगुर्लेकर, नाना पेडणेकर, संजय माजगावकर, भारती कासार, विनायक सावंत आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.