*कोकण Express*
*▪️निलंबित 17 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करा*
*▪️भाजपच्या शिष्टमंडळाने एस. टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे मागणी केलीी*
*▪️अन्यथा आंदोलन…भाजपाचा इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी 8 नोव्हेंबर पासून सुमारे 10 दिवस एस. टी. चे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने संप करत आहेत. सदर संप हा लोकशाही मार्गाने व शांततेत सुरू असताना विभागीय कार्यशाळा स्तरावरून कणकवलीतील 5 व जिल्हयातील एकूण 17 कर्मचाऱ्यांचे अन्यायकारक निलंबन करून त्यांच्यावर मोठा अन्याय कलेला आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्या, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने एस. टी. विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली आहे. ही कारवाई मागे न घेतल्यास भाजपा मार्फत आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिष्टमंडळाने दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सदरचा संप कोणत्याही एस. टी. संघटनेचा नसून तसेच त्या संपात कोणत्याही अन्य संघटनेचे पदाधिकारी नाहीत. सर्व संघटनेतील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीन पूकारलेला संप आहे. असे असताना एस टी कर्मचाऱ्यामध्ये निलंबन करून एक प्रकारे भितीचे वातावरणे निर्माण करून दबाव तंत्राचा वापर करणेत येत आहे असे दिसून येते. त्यामुळे आपण सदरचे केलेले अन्यायकारक निलंबन तात्काळ मागे घ्या. अन्यथा त्यांच्या न्याय मागणीसाठी भाजपाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपाच्या शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांना दिला आहे. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती दिलीप तळेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी सरपंच संदीप सावंत, भाई आंबेलकर, संतोष पुजारे, लक्ष्मण घाडीगावकर, सदा चव्हाण, रघुनाथ चव्हाण, सागर राणे, संदेश आर्डेकर, गोपीनाथ सावंत, राजेश जाधव आदी उपस्थित होते.