*कोकण Express*
*▪️खासदार सुप्रिया सुळे यांचे सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी केले स्वागत*
राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आज एकदिवसीय दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्गात आगमन झाले. खा. सुप्रिया सुळे यांचे कुडाळ रेल्वे स्थानकात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस नेते नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, उदय भोसले, संदीप राणे, सावळाराम अनावकर, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, दिलिप वरने, बाबू सावंत, अमित केतकर, इम्रान शेख, निशु कडुलकर, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर, अनिस नाईक आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.