*कोकण Express*
*▪️अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परब’चे प्रमोद जठारांकडून अभिनंदन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांपटू हिमानी उत्तम परबला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिमानी हिला अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे गुरु उदय देशपांडे यांचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी अभिनंदन केले.
हा बहुमान मिळविणारी हिमानी परब ही सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळविणारी हिमानी ही देशातील पहिली खेळाडू ठरली. तिने विविध स्पर्धांमध्ये 100 पेक्षा जास्त पदकांची कमाई आजवर केली आहे. राज्य शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार गतवर्षी तिला प्रदान करण्यात आला होता. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कसाल व्रजेवाडी येथे हिमानी परब हिचे घर आहे. सिंधुकन्या हिमानी परब अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.