*कोकण Express*
*▪️लाल परिच्या कर्मचार्यांचा असाही सन्मान भव्य रांगोळीद्वारे दिला संपाला पाठिंबा*
*▪️उदयोन्मुख कलाकार अक्षय मेस्रीच्या कलेचे सर्वत्र होतेय कौतुक*
*कासार्डे ः संजय भोसले*
राज्यभर एस.टी. महामंडळाचे राज्य शासनकडे विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या संपात सिंधुदुर्गातील कलाकारांनीही उडी घेतली असून तळेरे येथील अक्षय मेस्त्री या युवा कलाकाराने तळेरेतील बसस्थानकात सोमवारी दुपारी तब्बल ९६ स्वेअर फुटाची रांगोळी साकारून या संपाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.या रांगोळीत एस.टी. महामंडळाचा लोगोचा समावेश असून
*”लढा विलीनीकरणाचा!*
*आमचेही आपल्याला समर्थन!*
अशा आशयाचे स्लोगन वापरून जिल्ह्यातील कलाकारांच्या वतीने एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
जवळपास १८दिवस एस.टी कर्मचाऱ्यांचा राज्यभर संप सुरू आहे मात्र अद्यापही कोणताही तोडगा निघाला नसल्याने , ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीमुळे लांबून प्रवास करणाऱ्या शाळा,काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच बरोबर गावागावांतील लोकांची सध्या मोठी कुचंबणा आणि हाल सुरू आहेत. या युवा कलाकाराने रांगोळी माध्यमातून कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवत सामान्य जनता आणि कलाकार ही कर्मचाऱ्यांबरोबर असल्याचे रांगोळीतून अभिव्यक्त केले आहे.
सध्या जनतेची,विद्यार्थ्यांची
हाल अपेष्टा मोठ्या
प्रमाणात सुरू असल्याने या संपावर प्रशासनाने योग्य तोडगा काढून संप थांबविण्याची शासनाकडे विनंती केली आहे.
सदर रांगोळी साकारण्यासाठी या कलाकारांना सुमारे ७ तास इतका वेळ लागला आहे.या कामी मेस्त्री यांना प्रकाश नवाळे या विद्यार्थी कलाकाराचे ही विशेष सहकार्य लाभले