*कोकण Express*
*▪️गवाणे येथील श्रीमती सुलोचना सोनबा राऊत यांचे निधन*
*कासार्डे ः संजय भोसले*
देवगड तालुक्यातील गवाणे येथील रहिवासी श्रीमती सुलोचना सोनबा राऊत ( वय-७१) यांचे कणकवली येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले.
याराना मित्रपरिवाराची सदस्या आणि मुंबईतील नानावटी हाॅस्पिटलच्या अपघात कक्षाची मुख्य परिचारिका अधिकारी सौ.सुषमा राऊत ह्याची तसेच गवाणे येथील राजू राऊत यांची आई होत.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.