*कोकण Express*
*▪️मनसेच्या गणेश कदम यांच्या कडून कणकवली ओसरगाव विठ्ठल मंदिरास दोन अद्यावत सोलर लाईट प्रदान*
*ओरोस ः प्रतिनिधी*
मनसेच्या गणेश ज.कदम यांच्या कडून कणकवली तालुक्यातील ओसरगावच्या प्रसिध्द विठ्ठल रखुमाई मंदिरास मंदिर समितीच्या मागणीनुसार दोन अद्यावत सौर ऊर्जेच्या लाईट विठ्ठल रखुमाई विकास मंडळाचे अध्यक्ष बाबा आळवे यांच्या कडे सुपूर्द केल्या. त्यामुळे विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती व ओसरगावच्या जनतेने मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे व मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष मनसेचे अध्यक्ष गणेश कदम यांचे आभार व्यक्त केले. मनसेच्या गणेश कदम यांच्या कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोफत सोलर लाईटच्या उपक्रमामुळे वाढीव वीज बिलाने व लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.