झाराप तिठा ते साळगाव-माणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा,रस्ता रुंदीकरण साठी किती वर्षं प्रतिक्षा करावी लागेल स्थानिक ग्रामस्थांचा सवाल

झाराप तिठा ते साळगाव-माणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा,रस्ता रुंदीकरण साठी किती वर्षं प्रतिक्षा करावी लागेल स्थानिक ग्रामस्थांचा सवाल

*कोकण  Express*

*▪️झाराप तिठा ते साळगाव-माणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा,रस्ता रुंदीकरण साठी किती वर्षं प्रतिक्षा करावी लागेल स्थानिक ग्रामस्थांचा सवाल??*

*▪️या रस्त्याला वाली तरी कोण?संबंधित विभाग,विद्यमान आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी ना जाग तरी केव्हा येणार*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

झाराप नॅशनल हायवे ते माणगाव तिठा हा रस्ता सरासरी ५.०० कीमी चा रस्ता आहे.मोठ्या प्रमाणात रहदारीचा रस्ता,माणगाव दत्त मंदिर आणि टेंबे स्वामी जन्मस्थळाकडे सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातून,देश विदेशातून असंख्य भक्त गण याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवास करताना पाहायला मिळतात.गेली १५ वर्ष या रस्त्याला खड्डांच साम्राज्य,फक्त मलम पट्टी मारण्याचा काम ससुरू आहे.याकडे ना संबंधित विभाग,ना सत्ताधारी ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही यांना रस्ताचा संबंधितांना विसर पडलेला दिसून येत आहे.मात्र स्थानिक ग्रामस्थांमध्ये आक्रोश,व नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
२००६ मध्ये काही जागरूक नागरिक,स्थानिक ग्रामस्थांनी तसेच तीन व सहा सीटर रिक्षा संघटना यांनी आंदोलन केल्यामुळे माणगाव तीठा ते साळगाव हा ५०० मीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आला.या रस्त्यासाठी ना कुठल्या सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधकांनी या रस्त्याबाबत कुठलेही प्रयत्न केलेले दिसत नाही.या रस्त्याची अक्षर:क्षा चाळण झाली आहे.
रस्ता अरुंद साईडपट्टीचा पत्ता नाही त्यात सध्यास्थितीत आणखी जिओ ची केबल टाकण्यासाठी खोदकाम करून अजून अपघाताला कारणीभूत ठरलाय रस्ताचा,
विद्यमान आमदार,जिल्हा परिषद सदस्य यांना जाग तरी केव्हा येणार,राजकारणी मात्र आपल्या श्रेय वादासाठी निवडणुकीच्या तोंडावर सामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी पॅकेज जाहीर करण्याच्या निव्वळ निव्वळ घोषणाचा पाऊस पाडतात दीसत आहे.
माणगाव ग्रामस्थानी संबधित जिल्हा बांधकाम कुडाळ येथे चौकशी केले असता हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावाधिन आहे.तसेच आमच्याकडून तात्पुरत्या डागडुजी म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी १० लाख निधी देण्यात आला आहे. ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता गेली तीन वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्यासाठी आपण ४.२५ करोड निधी आपण मंजूर केला म्हणून सांगितले गेले.तो आजपर्यंत निधी कुठे खर्च केला गेला.तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना २०२० मध्ये आश्वासन देण्यात आले.रस्ता २०२१ मार्च मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल परंतु आज पर्यंत याला मुहूर्त सापडलेला दीसत नाही याची माहिती घेतली असता प्रत्यक्षात या कामाचा सर्वे ऑगस्ट २०२० मध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव तयार करायला सुरुवात झाली. अजूनही काही तांत्रिक अडचणी आहेत त्यासुद्धा दुरुस्त करून त्या विभागाने जे मुंबई मधील एस पी.एम कॉलेज आहे त्यांच्याकडे पाठवण्यात आला.रस्त्याचे जे काही अटी आहेत त्यांची पूर्तता होणे बाकी आहेत त्यानंतर तो प्रस्ताव पाठवून त्याची सरकारकडून मान्यता आल्यानंतरच हा रस्ताच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल.अशी माहिती संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे.

हा रस्त्यासाठी अजून कीती वर्ष दुरूस्ती साठी लागतील.काय लोकांच्या जिवाशी खेळत बसणार काय एक मेकांवर बोट दाखवायच काम करणार.सतंप्त स्थानिक ग्रामस्थाचा संबंधित विभाग, विद्यमान आमदार,स्थानिक लोकप्रतिनिधी यांना सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!