भैराईदेवी देवस्थान व्यवस्थापन योजनेला न्यायालयाची मंजुरी

भैराईदेवी देवस्थान व्यवस्थापन योजनेला न्यायालयाची मंजुरी

*कोकण Express*

*भैराईदेवी देवस्थान व्यवस्थापन योजनेला न्यायालयाची मंजुरी*

*ग्रामस्थ व भाविकांमध्ये ऊत्साहाला उधाण*

*कासार्डे ः संजय भोसले*

देवगड तालुक्यातील मोंड येथील भैराईदेवी देवस्थानचे व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावे, या दृष्टीने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
भैराईदेवी न्यासाचे उत्तम व्यवस्थापन व आर्थिक नियोजन करण्यासाठी कोणतीही घटना नियमावली योजना नसल्याने तसेच मानकरी वर्गाचे देवालयातील रितीचे अधिकार जैसे थे ठेवून गावातील इतर समाज घटकांचा (कुळ) विचार करून योजना सादर करण्यात आली होती.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात मानकरी वर्गाची बाजू विचारात घेऊन दि. २८ आॅक्टोबर २०२१ रोजी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
यासंदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार निरीक्षक यांनी दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ रोजी ग्रामसभा घेऊन श्री भैराई देवी न्यास हा २२ डिसेंबर १९६१ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या जमिनीवर नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट केले होते.
या कामी सहायक धर्मादाय आयुक्त. अधिक्षक व निरिक्षक यांनी उत्तम काम पाहिले.
आता सदर देवस्थानामध्ये सर्व मानक-यांचे अधिकार तसेच ठेवून इतर समाजघटकांनाही सामावून घेण्याच्या योजनेला आयुक्तांनी मंजुरी दिल्याने ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. त्यामुळे देवस्थानातील सर्व उत्सवांचा उत्साह द्विगुणित होणार असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!