*कोकण Express*
*▪️भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ चे घवघवीत यश*
*▪️शंभर टक्के निकाल लाऊन रचला इतिहास*
*कासार्डे ः संजय भोसले*
सेंट्रल प्रकाशन कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ शाळेतील ५० विद्यार्थी या परीक्षेस बसले होते, ५० ही विद्यार्थी उत्कृष्ट गुणासह उत्तीर्ण होऊन शाळेचा १००% निकाल लागला आहे.
राज्य व जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी इयत्ता निहाय पुढीलप्रमाणे –
इयत्ता पहिली- आर्या संदीप सावंत – राज्यात ४ थी आली तर नैतिकसिंग ज्ञानेश्वर परदेशी राज्यात ५ वा , अर्णव राजेंद्र राणे – जिल्ह्यात ५ वा आला.
*इयत्ता-दुसरी* श्रेयश श्रीराम विभूते
राज्यात २ रा आला. तर समृद्धी प्रकाश चौगुले- राज्यात ३ री , दुर्वा दिपक घाडी- जिल्ह्यात १ ली , गौरव रमेश राठोड – जिल्ह्यात २ रा , आर्यन शशिकांत दराडे – जिल्ह्यात ४ था , वेदांत विलास घाडी- जिल्ह्यात ४ था आला.
*इयत्ता-तिसरी*
गायत्री अमोल येणगे – राज्यात ५ वी आली तर आदिती राजीव बिरादा – जिल्ह्यात ४ थी आली आहे.
*इयत्ता -चौथी*
वेदांत बिभीषण मुंडे- राज्यात ५ वा आला तर हरेश संदीप कोळेकर – राज्यात ५ वा , वेद राजाराम शेळके – राज्यात ६ वा , सुधांशु देवरुखकर – जिल्ह्यात १ ला , मोहिनी केशव फड- जिल्ह्यात ४ थी आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप तळेकर, उपाध्यक्षा तथा सरपंच सौ.साक्षी सुर्वे,माजी अध्यक्ष शशांक तळेकर, व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.करंदीकर यांनी विशेष अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.