सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी शासकीय मेडिकल कॉलेज घाईगडबडीत सुरु करू नका

सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी शासकीय मेडिकल कॉलेज घाईगडबडीत सुरु करू नका

*कोकण  Express*

*▪️सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी शासकीय मेडिकल कॉलेज घाईगडबडीत सुरु करू नका*

*▪️विमानतळ ३-४ वर्षे लांबवून श्रेयवादाचा प्रश्न झाला तोच प्रकार शासकीय मेडिकल कॉलेज बाबतीत चालला आहे*

*▪️परशुराम उपरकर यांचा सवाल; विमानतळाप्रमाणे खेळखंडोबा नको*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी शासकीय मेडिकल कॉलेज घाईगडबडीत सुरु करु नये. प्रथम सोयीसुविधा निर्माण कराव्यात.चांगला शिक्षक वर्ग असावा;अद्ययावत यंत्रणा केल्यानंतरच ऍडमिशन करा.विमानतळ ३-४ वर्षे लांबवून श्रेयवादाचा प्रश्न झाला.तोच प्रकार शासकीय मेडिकल कॉलेज बाबतीत चालला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे सर्वच प्रकल्प मागे पडत चालले आहेत. निदान मेडिकल कॉलेजबाबत तरी असा प्रकार करू नका असा सल्ला मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले ,मेडिकल कॉलेजचे डीन श्री.मोरे यांची आम्ही भेट घेतली व समस्या जाणून घेतल्या.अगोदर मेडिकल कॉलेजच्या जागेवरून सत्ताधारी अंतर्गत वाद सुरु झालेत.शेवटी जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज करण्याचे निश्चित झाले.आता ८ एकर हॉस्पिटलची जागा आहे,आणि मागील २२ एकर जागा घेण्याचे ठरत आहे.मेडिकल कॉलेज बद्दल कोणत्याही प्रकारची तयारी नसताना मेडिकल कॉलेज करण्याकरिता हालचाली आहेत.त्या कॉलेजसाठी कोविड निधीतून काही खरेदी करण्यात आली.त्यांनतर तपासणीसाठी कमिटीला फसवण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली अधिकारी करत आहेत.रुग्णालयात रंगरंगोटी व तोडफोड करुन पार्टिशन करणे,असे प्रकार आहेत.मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.मोरे यांची आम्ही भेट घेतली.त्यांनी आलेल्या त्रुटीवर अपील दाखल केले आहे,त्यावर सुनावणी होवून निर्णय होईल,असे सांगितले. मात्र ,त्याचा ठावठिकाणा नाही,असा टोला परशुराम उपरकर यांनी केला. मेडिकल कॉलेजमध्ये घाईगडबडीत ऍडमिशन करु नये.पालकांच्या पाहणीत ही बाब निर्दशनाश आल्यानंतर चुकीचा मॅसेज जाईल. सद्या डॉ.मोरे याना बसण्यासाठी २५ खुर्च्या व १ स्टाप दिला आहे.या कॉलेज बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणताही निर्णय काढलेला नाही. आरोग्य प्रशासन बुचकळ्यात पडलेल्या अवस्थेत आहे. सध्या ३०० कॉटचे हॉस्पिटल आहे.त्यातच वाढीव कॉट गर्दीने ठेवत समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे.हॉस्पिटलमध्ये ५६० स्टाप हा वैद्यकीय कॉलेजचा असेल, उर्वरित हॉस्पिटलचा असेल.अद्यावत हॉस्पिटलमध्ये चार पाच ऑपरेशन थिएटर्स आहेत.त्यामुळे शासनकर्ते व लोकप्रतिनिधीना त्याची जाणीव आहे का?कॉलेज एक वर्षे लेट झाले तरी चालेल,परिपूर्ण काम करुन व्यवस्थित करावे.जिल्हा व राज्याबाहेर विद्यार्थी असतील.पालक येथील तेव्हा विद्यार्थी पुन्हा कमी होतील, त्याचे भान सत्ताधारी लोकांनी ठेवावे,असा टोला श्री .उपरकर यांनी लागवला आहे. कोणाला तरी शह देण्यासाठी हा प्रयत्न करू नये.पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणात निधी व लागणारे साहित्य निर्माण करूनच मेडिकल कॉलेज करावे.विमानतळाप्रमाणे नेहमी दिल्ली वारी करावी लागेल.खासदार यापूर्वीच दिल्लीत जाऊन बसले असते.तर मेडिकल कॉलेज खेळखंडोबा झाला नसता हे पाहिलं पाहिजे. जिल्हा रुग्णालयात ओपीडी कमी झाली आहे.कोविडमुळे मोठ्या प्रमाणात विकासासाठी खर्च न करता दुसरीकडे केला जात आहे.६५० कोटी मजुरी मिळाली असेल तर किमान १०० कोटी नेत्यांनी आणावे.आता मेडिकल कॉलेज भरतीसाठी प्रतिसाद नाही,केवळ ४ अर्ज प्राप्त झाले आहेत,असे श्री.उपरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!