*कोकण Express*
*▪️विनयभंगप्रकरणी युवकाला सशर्त जामीन मंजूर*
युवती बरोबर मैत्री करून तिच्या सोबतच्या मैत्रीचा गैरफायदा घेत कणकवली तालुक्यातील कलमठ – गावडेवाडी येथील अमित सुरेश लोके (32) यांने “त्या” तरुणीचा विनयभंग करत तरुणीला अश्लील शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमित लोके याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार कुडाळ तालुक्यात घडल्याने हा गुन्हा अधिक तपासासाठी कुडाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. आरोपी अमित लोके याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 15 हजाराच्या सशर्त जाचमुचलक्यावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्यावतीने ॲड. अविनाश परब व ॲड. सुहास साटम यांनी काम पाहिले.