वेंगुर्ले मध्ये “दिव्य दिवाळी उत्सव २०२१”चे दिमाखात उदघाटन

वेंगुर्ले मध्ये “दिव्य दिवाळी उत्सव २०२१”चे दिमाखात उदघाटन

*कोकण Express*

*▪️वेंगुर्ले मध्ये “दिव्य दिवाळी उत्सव २०२१”चे दिमाखात उदघाटन…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

दीपावली सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव २०२१ या तीन दिवस चालणाऱ्या कार्येक्रमाचे दिमाखात उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी खास उपस्थिती असलेले सिनेअभिनेते व मालवणी हास्यसम्राट दिगंबर नाईक यांच्या विनोदी भाषणाने व कार्येक्रमाच्या सुरवातीला त्यांनी घातलेल्या मालवणी गाऱ्हाण्याने उपस्थित रसिक भारावून गेले.

वेंगुर्ले कॅम्प येथील नगरपालिकेच्या नव्याने विकसित केलेल्या त्रिवेणी संगम उद्यान येथे मोठ्या दिमाखात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना दिगंबर नाईक म्हणाले की कोकणी माणसाचा मन ह्या सगळ्या रंगानी भरलेला असता. त्येका खायचो वेगळो रंग दिवची गरज नाय. कोकणी माणूस हे नेहमी कलावंतांच्या कलेक आवर्जून दाद दिततच. या दरम्यान त्यांनी नगरपालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट विषयी व नगरपालिकेच्या वेगवेगळ्या उपक्रमांबाबत गौरवोद्गार काढले.
यावेळी उदघाटन पर भाषणात राजन तेली म्हणाले की, ताज सारखे प्रकल्प आपल्याकडे येताहेत आणि असे अनेक प्रकल्प यायलाच पाहीचे परंतु ते नुसते येऊन चालणार नाहीत तर त्याचा काहीतरी स्थानिकांना फायदा झाला पाहिजे. सुधारणा आणि स्थानिकांना त्याचा फायदा होईल असे काहीतरी करून दाखवावे म्हणजे खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल असेही ते म्हणाले.

तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेला दिव्य दिवाळी उत्सव या कार्येक्रमासाठी वेंगुर्ले कॅम्प येथील नगरपालिकेच्या त्रिवेणी संगम उद्यानात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, रत्नागिरी – सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी यांच्या सह भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले, ता.सरचिटणीस श्री बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेविका क्रुपा गिरप-मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, परबवाडा सरपंच पपु परब, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर – वृंदा मोर्डेकर – रसीका मठकर – आकांक्षा परब, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर, कमलेश गावडे, आय.टी.सेलचे केशव नवाथे, रविंद्र शिरसाठ, किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्येक्रमा दरम्यान भाजपने आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. व त्यानंतर दीपावली शो टाईम अंतर्गत आयोजित केलेल्या ” अनिता कराओके ” कार्येक्रमाला सुरुवात झाली. यावेळी वेंगुर्लेवासीयांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले व आभार वसंत तांडेल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!