*कोकण Express*
*▪️आमदार दीपक केसरकरांनी राजकिय अज्ञान प्रकट करू नये*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
आमदार हे केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादीत नसतात ते राज्यातील विधायक आणि विकासात्मक विषयावर बोलू शकतात. आवश्यक अशा ठिकाणी पाहणी दौरे किंवा भेटी देऊ शकतात तो त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संविधानाने दिलेला अधिकार आहे.हे राज्यमंत्री राहिलेल्या आमदार दिपक केसरकर यांना कळू नये यातून त्यांचे राजकीय अज्ञान प्रकट झाले. असे सडेतोड प्रतित्युत्तर समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आमदार केसरकर यांना दिले. आमदार नितेश राणे यांनी करत दोडामार्ग भाजप च्या उपोषणास भेट दिली. त्यांनी अधिकारी यांना समज देत वीकास कामे मार्गी लावा असे सुनावले. जे काम स्थानिक आमदार दिपक केसरकर यांनी करायला हवे होते ते आमदार राणे यांनी केले. यावर आमदार केसरकर यांनी आमदार राणे यांनी स्वतःच्या मतदारसंघ बघावा आपल्या मतदारसंघ यात ढवळाढवळ करू नये अशी टीका केली होती त्याला समाजकल्याण सभापती जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून उत्तर दिले. जाधव पुढे म्हणालेकी, निवडून आलेले आमदार राज्यातील विकासात्मक विषयावर बोलू शकतात. आवश्यक अशा ठिकाणी भेटी दौरे आयोजित करु शकतात.हा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि हेच काम आमदार राणे यांनी भाजप च्या दोडामार्ग मधील उपोषणास भेट देत केले. यात गैर काही केले नाही. आमदार केसरकर आपण रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यास कमी पडलात म्हणून लोक आंदोलन, उपोषण करीत आहेत. लोकांचे प्रश्न समजून घेणे ते सोडविण्याची जबाबदारी घेऊन सामान्य जनतेला धीर देण्याचे काम आमदार राणे यांनी केले. याला केसरकर तुम्ही ढवळाढवळ म्हणत असाल तर अवश्य म्हणा ती आम्ही जनतेच्या विकासाठी वारंवार करू. पण तुम्हाला जमलं नाही ते आमदार राणे यांनी उपोषण स्थळी उपस्थित अधिकारी यांना सुनावत लवकरच बैठक लावण्याच्या सूचना केल्या आणि अधिकारी यांनी ती सूचना मान्य ही केली.शिवाय आमदार म्हणून असलेले अधिकार खुद्द तिसरी टर्म च्या आमदार केसरकर यांनाच कळू नये, कि आमदार हा केवळ आपल्या मतदारसंघ यापुरता मर्यादीत नसतो. आमदार राज्यातील विषयावर बोलू शकतात, दौरे आयोजत करू शकतात. हा लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार आहे. अशी विधाने करून केसरकरांनी आपल्या बालिश स्वभाव दाखवून दिला. राहिला प्रश्न आमदार राणे यांच्या मतदारसंघातील विकास कामाचा. सत्तेत राहून जे तुम्हाला जमलं नाही ते राणे यांनी विकास कामे करून लोकांचा विश्वास मिळावीला. आमदार राणे दोन वेळा आमदार म्हणून निवडणून आले परंतु दोन्ही वेळा राज्यातील विरोधी पक्षातील आमदार मतदार संघात काम करत आहेत. तरी सुद्धा विकास कामे केली आहेत. केसरकर यांना प्रत्यक्ष पाहायची असतील तर सांगावे पूर्ण मतदारसंघ भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फिरवून आणतील. आमदार केसरकर आपण तिन्ही वेळा सत्तेतील आमदार राहिला आहात. एकदा तर राज्यमंत्री आणि पालकमंत्री सुद्धा राहिलात. त्यामुळे किती विकास कामे व्हायला हवी होती. का पूर्ण होऊ शकली नाही आडाळी प्रकल्प याचे उत्तर केसरकर आपल्यालाच द्यावे लागणार. रस्त्याच्या प्रश्न यावर जनता तुम्हालाच जाब विचारणार. आणि केसरकर तुमचे कसं झालं मीही काम करणार नाही आणि दुसऱ्याला ही करू देणार नाही असा तुमचं स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे दोडामार्ग मधील जनता भरडली गेली. तुमच्या अपयशाचे खापर तुम्ही नेहमीच राणे परिवार फोडत आला आहात. आता तर निवडणूका येऊ घातल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा गाजलेला दहशतवादाचा जुना चित्रपट तुमच्या बंद पडलेला चित्रपटगृहात लावणार हे सगळं जिल्ह्यातील जनतेला कळालेल आहे.आता तुम्ही सावंतवाडी शहरात राजकीय सभ्यपणाचा मुखवटा लावून फिरणार, लोकांना भावनिक आवाहन काय करणार, प्रसंगी डोळ्यात अश्रू ही आणला. हे हा तुमचा राजकीय अजेंडा जनतेला माहित आहे. त्यामुळे आमदार केसरकर यांनी केलेली टीका ही बालिश आहे. असे प्रत्युत्तर समाजकल्याण सभापती जाधव यांनी दिले.