मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपूर्ण

मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपूर्ण

*कोकण Express*

*मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपूर्ण….*

*मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची हायकोर्टात जनहित याचिका…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या पट्ट्यातील मुंबई – गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने व सिंधुदुर्ग येथील कलमठ ते झाराप या पट्ट्यातील महामार्गावर खूप खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांचा अपघात होऊन अनेक लोकांना जीव गमवावा लागले आहेत . त्यामुळे या पट्ट्यातील महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत , अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज दिली.
न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारसह सर्व कंत्राटदारांना नोटीस बजावत २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही याचिका ऍड. तेजस दांडे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बुधवारी या याचिकेवरील सुनावणी न्या. के. के. तातेड व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकेनुसार, मुंबई – गोवा कंत्राटदारांना नोटिसा महामार्गाचे रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा करार २०१७ मध्ये कंत्राटदारांबरोबर करार करण्यात आला होता. मात्र अद्याप काम सुरु झालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्हयातील कलमठ ते झाराप या पट्ट्यातील दोन मोठे उड्डाणपुलाचा भाग कोसळला. याबाबत नोटिसा या संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने संबंधित कंत्राटदारांनी उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे सामान वापरल्याचे अहवालात म्हटले आहे . तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही , अशी माहिती ऍड. तेजस दांडे यांनी न्यायालयाला दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!