*कोकण Express*
*▪️पूरग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी ; पुंडलिक दळवी यांनी वेधले लक्ष*
जुलै २०२१ मधील महापुरात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांच्या खात्यात निधी जमा करण्याबाबत, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराबाबत विलवडे ग्रामस्थांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच लक्ष वेधल. यावेळी सोमवारी याबाबत संबंधितांची बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिलं. यावेळी विनायक सावंत, विलवडे येथील पुरग्रस्त उपस्थित होते.