*कोकण Express*
*▪️मळगाव येथून संवाद यात्रेला १४ नोव्हेंबरला सुरुवात…*
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एका खून प्रकरणी सावंतवाडी संस्थानला दिलेल्या भेटीचे प्रेरणाभूमीत रुपांतर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीने समाजात समतेचे व एकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या संवाद यात्रेची सुरुवात १४ नोव्हेंबरला मळगाव येथून होणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ ऑक्टोबर १९३२ रोजी एका खून प्रकरणात आरोपीचे वकील म्हणून तत्कालीन राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या समोर उपस्थित राहून आरोपींची बाजू मांडली होती व सलग तीन दिवस त्यांनी मुक्काम केला होता.त्यावेळी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतलेला होता.त्या स्थळावर सावंतवाडी नगर पालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान उभारले आहे.
या घटनेला तब्बल ८९ वर्ष पूर्ण झाल्याने जिल्हयातील आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीचे प्रेरणाभूमीत रुपांतर करण्यासाठी वरील संघटनेची स्थापना दीपक पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एक १० वर्षाचा कृती आराखडा तयार केला आहे.त्यानुसार प्रथम टप्पा म्हणून या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.तर पुढील रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नेमळे येथे या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यानुसार संवाद यात्रा मळगाव येथून येत्या रविवारी दि.१४ रोजी सायंकाळी ६ वाजता समाज मंदिर येथे उद्घाटन होणार आहे.सदर कार्यक्रमात मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीने केले आहे.