*कोकण Express*
*▪️वैभववाडी:एडगांव सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे सुनील रावराणे:व्हा. चेअरमनपदी श्रीधर घाडी बिनविरोध*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
एडगांव येथील श्री रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे सुनील रावराणे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नि. निर्णय अधिकारी पी.एस. जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. या निवडणुकीत सुनील श्रीपत रावराणे यांचा एकमेव अर्ज चेअरमन पदासाठी प्राप्त झाला होता. तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्रीधर घाडी यांचा अर्ज प्राप्त झाला होता. चेअरमन पदासाठी सूचक म्हणून जयेंद्र रावराणे, अनुमोदन गंगाराम आडुळकर यांनी स्वाक्षरी केली आहे. तर व्हा. चेअरमन पदासाठी सूचक म्हणून सदानंद गुरव, अनुमोदन म्हणून सचिन रावराणे यांनी स्वाक्षरी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस. जाधव यांनी सुनील रावराणे यांची चेअरमन पदी तर श्रीधर घाडी यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड जाहीर केली.
जेष्ठ संचालक जयेंद्र रावराणे, जेष्ठ संचालक प्रमोद रावराणे यांनी नूतन चेअरमन सुनील रावराणे व श्रीधर घाडी यांचा पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी संचालक सचिन रावराणे, संचालक अशोक रावराणे, संचालक गंगाराम अडुळकर, संचालक सदानंद गुरव, संचालक गंगाराम वनकर, संचालक सरिता घवाळी, संचालक रेश्मा सुतार, गटसचिव पी.बी. पार्टे, ग्रामस्थ आप्पा रावराणे, विनोद रावराणे आदी उपस्थित होते.