सावंतवाडीतील नागरिकांनी जागरूक रहावे… तरच मी पालिका निवडणुकीत “प्रेस्टीज” लावणार

सावंतवाडीतील नागरिकांनी जागरूक रहावे… तरच मी पालिका निवडणुकीत “प्रेस्टीज” लावणार

*कोकण  Express*

*▪️सावंतवाडीतील नागरिकांनी जागरूक रहावे… तरच मी पालिका निवडणुकीत “प्रेस्टीज” लावणार…*

*▪️पैसे घेऊन मते विकणे ही सावंतवाडीची संस्कृती नाही ; मात्र सत्ताधाऱ्यांनी ती या ठिकाणी आणलीी…*

*पैशांना बळी पडून मते विकू नका, शहराचा विकास करेल अशाच उमेदवाराला मतदान करा ; दीपक केसरकर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येणा-या पालिका निवडणुकीत सावंतवाडीकरांनी जागरूक राहीले पाहीजे. मी उभा नाही, तर मतदान नाही, ही परिस्थिती बदलली पाहीजे, तरच येणा-या निवडणुकीत मी माझे “प्रेस्टीज” लावणार आहे. मी आणलेल्या निधीतून कमिशन खाऊन माझ्यावर टीका करणा-यांच्या विरोधात काय बोलणार ? असा टोला आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला. दरम्यान माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या विरोधात माझी आजही कोणती भूमिका नाही. मात्र त्यांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे सांगून येणा-या निवडणुका ह्या महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.केसरकर यांनी आज याठीकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. श्री. केसरकर पुढे म्हणाले, येथील नगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडीचा धर्म कायम पाळण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यासाठी याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सोबत घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. तर बबन सळगावकारांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी त्यांच्या बद्दल कोणताही राग माझ्या मनात नाही. त्यामुळे त्यांनी आपली मानसिकता बदलून ते आमच्या सोबत आले तर नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पैसे घेऊन मते विकणे ही सावंतवाडीची संस्कृती नव्हती. मात्र आताच्या सत्ताधाऱ्यांनी ती या ठिकाणी आणली आहे. ती बदलण्याची गरज जनतेला आहे . त्यामुळे पैशांना बळी पडून मते विकू नका, शहराचा विकास करेल अशाच उमेदवाराला मतदान करा, असेही आवाहन त्यांनी केले. तर मी माझ्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी पालिकेला दिला आहे. त्याचे कमिशन खाऊनच विरोधक माझ्यावर टीका करत आहेत. मात्र तो निधी मी दिला असा कुठेही उल्लेख करत नाहीत. येथील जनतेला मी केलेली विकास कामे माहित आहेत. आणि ती त्यांच्या समोर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!