*कोकण Express*
*▪️गोकुळ दुध उत्पादक संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांची नवीन कुर्ली गावात सदिच्छा भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गोकुळ दुध उत्पादक संघ कोल्हापुरचे विद्यमान नवनिर्वाचीत संचालक तथा कोल्हापुर जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांनी नवीन कुर्ली येथे अमित दळवी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी गावातील ग्रामस्थांची भेट घेवुन गोकुळ दुध उत्पादक संस्थेचे माहिती व गावातील विविध समस्यांबाबत प्रदिर्घ चर्चा करुन समस्या सोडविण्याकरीता मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करु अशी ग्वाही दिली.
यावेळी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि.) अधक्ष राजेंद्र कोलते यांनी अभिजित तायशेट्ये यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी उद्योजक शेखर आजगावकर,ग्रामविकास मंडळाचे सचिव धीरज हुंबे सदस्य प्रकाश दळवी,सदाशिव राणे,भगवान तेली,अंकुश दळवी,कृष्णा परब, दिपक शिंदे, अरुण पिळणकर,भाग्येश पवार,अनिल दळवी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

