कणकवली पं स ची मासिक सभा 12 नोव्हेंबर रोजी लोरे गावात

कणकवली पं स ची मासिक सभा 12 नोव्हेंबर रोजी लोरे गावात

*कोकण  Express*

*▪️कणकवली पं स ची मासिक सभा 12 नोव्हेंबर रोजी लोरे गावात*

*कणकवली  ः  प्रतिनिधी*

कणकवली पं. स.ची मासिक सभा १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता लोरे नं १ ग्रामपंचायतच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पं. स. च्या सभागृहात होणाऱ्या मासिक बैठकीमध्ये तालुक्यातील खेडेगावातील जनतेच्या समस्या आणि विकासात्मक बाबींचा उहापोह होत असतो. वर्षातून एकदा पं स ची मासिक बैठक पं स च्या सभागृहाऐवजी तालुक्यातील गावात घ्यावी असे शासनाचे निर्देश आहेत. थेट गावात होणाऱ्या या सभेला पं स चे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, सर्व पं स सदस्यांसह सर्व खातेप्रमुख हजेरी लावतात. त्यामुळे गावातील समस्यांचा थेट अनुभव पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही घेता येतो.

गावातील जनतेच्या आरोग्य, विकास विषयक कामकाजाच्या दृष्टीने वर्षातील एक बैठक पं स च्या सभागृहाऐवजी तालुक्यातील गावात घेण्याचे कलम ११८ /३ नुसार शासन निर्देश आहेत. याच अनुषंगाने उद्या १२ नोव्हेंबर रोजी होणारी कणकवली पं स ची बैठक लोरे नं १ गावाच्या ग्रामसचिवालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!