BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक हक्काच्या पैशांपासून वंचित

BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक हक्काच्या पैशांपासून वंचित

*कोकण Express*

*▪️BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक हक्काच्या पैशांपासून वंचित..*

*▪️शिक्षक भारतीचा आंदोलनाचा पवीत्रा*

*कासार्डे  ः   संजय भोसले*

राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. त्यासाठी आम. कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना पत्रं पाठवण्यात आली आहेत. लवकरच आम. कपिल पाटील स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊनही मंत्री महोदयांना याबाबतची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तीक कामकाजा साठी, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, गृह कर्ज हफ्ता भरण्यासाठी स्वतःच्या PF खात्यातून पैसे मिळण्याबाबत अर्ज केलेले आहेत. मात्र राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. वेळेवर पैसे न मिळाल्याने शिक्षक, कर्मचारी यांच्या समोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांचे उपचार थकले आहेत. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलांची फी थकली आहेत, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे व प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी दिली आहे.
शिक्षक, कर्मचारी यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे न झाल्यास शासनाबद्दल एक अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे तात्काळ BDS प्रणाली सुरू करून PF धारकांना महिना अखेरपर्यंत त्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्यास शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशाराही कार्याध्यक्ष सुभाष मोरे व प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!