एस.टी कर्मचा-याच्या संपास आणखी धार, शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहिर पाठिंबा

एस.टी कर्मचा-याच्या संपास आणखी धार, शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहिर पाठिंबा

*कोकण Express*

*▪️एस.टी कर्मचा-याच्या संपास आणखी धार, शिक्षक भारती सिंधुदुर्गचा जाहिर पाठिंबा*

*कासार्डे  ः  संजय भोसले*

शिक्षक भारती माध्यमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग या शासन मान्यताप्राप्त व जिल्ह्यात सर्वात आक्रमक व बलाढ्य असलेली शिक्षक भारती माध्यमिक संघटनेच्यावतीने एसटी कर्मचारी संपास जाहीर पाठिंबा कुडाळ, येथे उपस्थित राहून व लेखी पत्राद्वारे दिला आहे. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळ शासकिय सेवेत विलीनीकरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात बेमुदत संप सुरु आहे. या पत्रात शिक्षक भारतीने म्हटले आहे की,आपल्या मागण्या रास्त आहेत, याची दखल शासन स्तरावर लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.

आज दि. 11 नोव्हेंबर 2021 पासून दिवाळी सुट्टी संपून नियमीत शाळा सुरू होत आहेत.एसटी ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची, शेतक-यांची व सर्व सामान्य जनतेची रक्तवाहीनी म्हणून ओळखली जाते. इतके महत्वाचे काम करणारे कर्मचारी कित्येक वर्ष आपल्या मागण्या शासन दरबारी मांडत आहेत .परंतु अद्याप त्याची दखल कोणत्याही पक्षाच्या शासनाने घेतलेली नाही. त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करून त्वरित सोडवावा व आजपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एसटीतून प्रवासास कसे जाता येईल यासाठी शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावा. म्हणून लवकरात लवकर या कर्मचारी संघटनांच्या मागण्या मान्य करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीने केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पातळीवरील तमाम, शिक्षक भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिलेदार,सर्व सभासद आपल्या संघटनेच्या पुकारलेल्या संपास जाहीर पाठिंबा देत आहोत, अशा आशयाचे पत्र शिक्षक भारतीचे राज्य प्रमुखकार्यवाह तथा जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण,कुडाळ तालुका अध्यक्ष माणिक पवार, सचिव सुशीलकुमार कडुलकर, पदाधिकारी अनिकेत वेतुरेकर अन्य जिल्हा व तालुका पदाधिकार-यांना कुडाळ येथील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
या पाठीब्यांचा आदर राखून भारावलेल्या एस् टी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यानी शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!