ठाकरे सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करावा अन्यथा आंदोलन – भाजपा कुडाळ तालुका

ठाकरे सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करावा अन्यथा आंदोलन – भाजपा कुडाळ तालुका

*कोकण Express*

*▪️ठाकरे सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करावा अन्यथा आंदोलन – भाजपा कुडाळ तालुका*

*▪️आमदार वैभव नाईक यांनी आता राज्य सरकार विरोधात स्वत च्या पेट्रोल पंपावर आंदोलन करावे*

*▪️इंधन कर कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा*

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करावा अन्यथा भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन छेडेल भाजपा असा इशारा कुडाळ तालुका भाजपच्या वतीने देण्यात आला असून कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले की डिझेल पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेने सायकल रॅली सारखी आंदोलने केली आता शिवसैनिकांनी राज्य सरकारला पेट्रोल-डिझेल वरील कर कपात करण्यासाठी आंदोलन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात केली आहे तसेच भाजपप्रणीत राज्य सरकारने सुद्धा कर कपात केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या महा विकास आघाडीने सुद्धा दर कपात करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तहसीलदार अमोल पाठक यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, जिल्हा कार्यकारणी निमंत्रक राजू राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे दादा साईल माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर महिला आघाडी नेते सौ. अस्मिता बांदेकर शहराध्यक्ष राकेश कांदे युवा मोर्चाचे रूपेश कानडे, रुपेश बिडये, श्रीपाद तवटे, पंचायत समिती सदस्य भास्कर नाईक, सुप्रिया वालावलकर, बंड्या सावंत, अविनाश पराडकर, राजेश पडते, माजी सभापती राजन जाधव, विजय कांबळी, निलेश परब, आदिती सावंत, रेवती राणे, स्नेहा सावंत, मुक्ती परब, सुर्यकांत नाईक, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, अभिषेक राऊळ, राकेश नेमळेकर, तन्मय वालावलकर आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आले या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय….. ठाकरे सरकार हाय हाय….. या घोषणांनी तहसील कार्यालय घुमले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले की केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोल वरील करात कपात केली आहे भाजपप्रणीत राज्य सरकारने सुद्धा कर कपात केली आहे मात्र महा विकास आघाडी असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप कर कपात केलेली नाही जर पेट्रोल डिझेल वरील करकपात झाली तर वाहनधारकांना दिलासा मिळू शकेल असे सांगून केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडणाऱ्या शिवसैनिकांनी आता राज्य सरकारच्याविरोधात डिझेल पेट्रोल वरील कर कपात करण्यासाठी आंदोलन खेळावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!