*कोकण Express*
*▪️इंधन कर कपात करा अन्यथा भाजप आंदोलन छेडणार*
*▪️सरकार विरोधात कणकवली भाजपाचे प्रांताधिकार्यांना निवेदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीला या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागले. असा इशारा देत कणकवली तालुका भाजपच्यावतीने प्रांताधिकार्यांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, प्रज्ञा ढवण, महेश गुरव,गणेश तळगावकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे,पप्पू पुजारे, सुहास राणे, पंढरी वायंगणकर, संदीप मेस्त्री, प्रकाश पारकर, सोनू सावंत, सचिन पाराधिये आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
♦️त्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या आर्थिक ओढाताणीची दखल घेऊन केंद्र सरकाराने पेट्रोल ७ रूपये व डिझेल १० रूपये या प्रमाणे करात कपात केली आहे. तसेच भाजपा प्रणित राज्य सरकारांनी देखील या निर्णयाची दखल घेत पेट्रोल व डिझेलवर सर्वसाधारणपणे प्रत्येकी ७ रू.कपात केली आहे. त्यामुळे एकूण दरात पेट्रोलवर १२ रुपये व डिझेलवर १७ रुपये कपात झाली आहे. आपल्या शेजारच्या गोवा व कर्नाटक सरकारने देखील ही कपात केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेल मुदयांवरून आंदोलन व मोर्चा काढतात. पण पेट्रोल व डिझेल विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या कराच्या वाटयात कपात करून सर्वसामान्य कुठलाही दिलासा देत नाहीत हे निषेधार्ह आहे. असे सांगत कणकवली तालुका भाजपच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.