*कोकण Express*
*▪️उपोषणाचा रस्ता प्राधिकरणाने घेतला धसका, दिवाळी संपताच सुरू केला कामाचा दणका*
*कासार्डे ः संजय भोसले*
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत तळेरे येथील शैक्षणिक संकुलादरम्यान पादचारी पथ तयार करणे व बॅरिकेट्स बसविणे या कामास अखेर सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते.अखेर उशिरा जाग आलेल्या महामार्ग प्राधिकरणाने याबाबतची तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
याप्रसंगी पंचायत समिती कणकवलीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे माजी सरपंच शशांक तळेकर, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, रोहित महाडिक, बली तळेकर, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी नलगे, के. सी. सी. ठेकेदार कंपनीचे श्री. द्विवेदी आदी उपस्थित होते.