*कोकण Express*
*▪️आझादीका अमृत महोत्सव निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*▪️जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचा स्तुत्य उपक्रम मात्र वेळ अपूरी*
*कासार्डे ः संजय भोसले*
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशाने “आझादी का अमृत महोत्सव”निमित्त व विधी सेवा सप्ताह यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ०८/११/२०२१ ते दिनांक १४/११/२०२१ या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध वयोगटानुसार या स्पर्धा घ्यावयाच्या असून, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने त्या स्पर्धेचे आयोजन करून आपल्या स्तरावर विजेत्या प्रथम तीन क्रमांकाचे स्पर्धक निवडायचे आहेत. या स्पर्धेचे वयोगट व विषय खालील पद्धतीने असतील
१). चित्रकला स्पर्धा :-इयत्ता ५वी ते ८वी वयोगट 11 ते 15 वर्ष विषय :-कोरोना/बालमजूरी/शिक्षणाचा अधिकार.
२). निबंध स्पर्धा:- ८वी ते१०वी , वयोगट :-१२ ते १६ वर्षे
विषय :-भारतिय राज्यघटना.
३). घोषवाक्य लेखन स्पर्धा :-इयत्ता ९ वी ते १२ वी ,
वयोगट :-१४ ते १८ वर्षे
विषय :-कोरोना /बालमजूरी/शिक्षणाचा अधिकार/बेटी बचाव बेटी पडावं.
४). चित्रपट निर्मिती स्पर्धा:- ९वी ते १२वी
वयोगट :- १५ ते १८ वर्षे
विषय:- लोकन्यायालय / मध्यस्थी.
यातून निवडलेल्या स्पर्धकांची नावे दिनांक 12 /11 /2021 पर्यंत लेखी स्वरूपात सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात वेळीच सादर करण्यात यावे असे सांगितले आहे. मात्र सध्या 10 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी असल्याने आणि 11 नोव्हेंबर रोजी विद्यार्थी शाळेत हजर होत असल्याने त्या स्पर्धा कधी राबवायच्या हा खरा प्रश्न आहे. एका दिवसामध्ये या स्पर्धा राबवून निकाल तयार करणे जरी शक्य असले तरी त्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही ही मोठी अडचण आहे. तरी सदर स्पर्धा परीक्षांचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.