*कोकण Express*
*▪️कै.सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
जांभवडे, तालुका कुडाळ येथील कै. सिताराम (आबा) सखाराम तर्फे सर चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त कै. सुहास तर्फे यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ न्यु शिवाजी हायस्कूल जांभवडे हायस्कूला पाच लिटर सॅनिटाइझर, एक ऑक्सिमिटर, एक थर्मल गण, पाचशे मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सचिव श्री. वामन तर्फे प्राचार्य श्री सावंत सर, सदस्य श्री संजय तर्फे, मोहन तर्फे, सौ. सोनाली तर्फे, अभिषेक तर्फे, प्रतिक तर्फे, प्राची तर्फे, यतीश तर्फे, श्री. निबांळकर सस, श्री. कासले सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने नेहमीच विविध शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ट्रस्ट स्थापन झाल्यापासून जांभवडे पंचक्रोशीतील लोकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यानंतर जांभवडे हायस्कूला शैक्षणिक विकासासाठी ट्रस्टच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन ट्रस्टचे सचिव श्री. वामन तर्फे यांनी आपल्या मनोगतात केले. यावेळी प्राचार्य श्री. सावंत सर यांनी ट्रस्टचे आभार मानले.

