*कोकण Express*
*▪️एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे, त्यासाठी खास अधिवेशन बोलवा*
*▪️विरोधी पक्षाचे आमदार समर्थन देऊ आम्ही ; आमदार नितेश राणे*
*▪️सावंतवाडी येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दिली भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे, त्यासाठी खास अधिवेशन बोलवा, आम्ही विरोधी पक्षाचे आमदार पुढे येऊन त्यांना समर्थन देऊ, त्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा आता अंत पाहू नका, अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी आज येथे मांडली. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहेत. त्यांच्यावर ही वेळ का आली ? याचा शासनाने विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नितेश राणे यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक परीमल नाईक, आनंद नेवगी, महेश सारंग, गुरुनाथ पेडणेकर, मानसी धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, महेश धुरी, अजय सावंत, बंटी राजपुरोहित, अजय गोंदावले, मोहिनी मडगावकर आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नितेश राणे पुढे म्हणाले, कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिक सेवा एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आत्महत्या नसून हत्या आहेत. राज्य शासनात एसटी कर्मचाऱ्याचा समावेश व्हावा, ही वर्षानुवर्षे एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र या सरकारची मानसिकता या कर्मचाऱ्यांना मदत करण्याची नाही. दरम्यान झालेल्या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी आपली असणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर एक दिवशीय तात्काळ अधिवेशन बोलवावे व एसटी प्रशासनाच्या विलगिकरणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली.