*कोकण Express*
*▪️बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का?*
*▪️नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या विषयावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मधील आरोपीकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधींची जमीन केवळ २० लाखांत विकत घेतली, ती कशी ? आणि मुंबईकरांच्या चिंधड्या उडवणाऱ्या व्यक्तींशी मलिकांनी व्यवहार केला कसा? असे सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटर वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं… आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय… खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

