योगायोगाने नगराध्यक्ष झालेले संजू परब हे मावळते नगराध्यक्ष

योगायोगाने नगराध्यक्ष झालेले संजू परब हे मावळते नगराध्यक्ष

*कोकण Express*

*योगायोगाने नगराध्यक्ष झालेले संजू परब हे मावळते नगराध्यक्ष*

*दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर; ज्यांना “बजेट” माहीत नाही, त्यांना मी आणलेला निधी कसा कळणार…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

योगायोगाने नगराध्यक्ष झालेले संजू परब हे मावळते नगराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे आता फक्त एक महिना दहा दिवस शिल्लक आहे.त्यांच्या मुळे सावंतवाडीची अधोगती झाली.अशी खिल्ली उडवत,ज्या व्यक्तीला पालिकेचे बजेट माहित नाही त्यांना मी आणलेला निधी कसा समजणार, असे प्रत्युत्तर आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान माझ्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या संजू परब यांची राजकीय उंची नाही. त्यांची पात्रता काय हे त्यांच्या नेत्यांनी त्यांना दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर बोलण्यासाठी मला वेळ नाही, असेही केसरकर यांनी सांगितले. नगराध्यक्ष परब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांच्यावर आरोप केले. याला पत्रकार परिषदेत श्री.केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.

श्री केसरकर पुढे म्हणाले, विद्यमान पदाधिकाऱ्यांना पालिकेचे बजेट माहित नाही.त्यामुळे मी शहरासाठी वेगवेगळ्या हेड खाली किती निधी दिला हे त्यांना समजू शकत नाही. नगरपालिकेचा कारभार चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळे काय होते? हे येथील जनतेने पाहिले आहे. नगराध्यक्ष संजू परब यांना योगायोगाने काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी त्याचा जनतेला कसा फायदा करून देता येईल,याकडे लक्ष द्यावे,असे ते यावेळी म्हणाले.
शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा,अन्यथा सीआयडी कडे तपास सोपवावा,अशी मागणी आम्ही योग्य वेळी करणार आहे.दरम्यान मी गृहमंत्री असताना शहरात सीसीटीव्ही तसेच पोलिस अधिकाऱ्यांना चारचाकी गाड्या,बाईक देण्यात आल्या आहेत.त्यामुळे काम करणारे सक्षम अधिकारी या ठिकाणी पाहिजेत.सक्षम अधिकारी नसल्यास अधिकारी बदलावे लागतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!