*कोकण Express*
*▪️”हिंम्मत असेल तर नारायण राणेंनी वैभव नाईकांसमोर पुन्हा एकदा कुडाळ मालवण विधानसभा लढवून दाखवावी” 100% डीपाॅझीट जप्त करून दाखवलं नाही तर नाव सांगणार नाही–विनायक राऊत*
*▪️होय मी आता जाहीर आरोप करतो की नारायण राणेंनीच शासकीय मेडिकल कॉलेजसाठी विरोध करत दबाव आणला.*
*▪️मामाच्या गावात विनायक राऊत यांची मालवणी भाषेत शेरे छायरी करत राणेंवर आणि भाजपावर टोलेबाजी*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
शिवसेनेच्या अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, दोनदा मुलाला आणि एकदा तुम्हाला आपटलं हिम्मत असेल तर परत कुडाळ मालवण विधानसभा लढवून दाखवा.
खरा भाजपा कुठे बाजूलाच गेला मात्र आता सिंधुदुर्गात नारायण राणे पुरस्कृत भाजपा दिसतोय.
नौटकी चे प्रवेश आमचे नाहीत, आम्ही खरे प्रवेश करून घेतो.
काही कारटी मुख्यमंत्र्याना दिवसभर शिव्या घालतात परंतु रात्रीही घालतात आणि टिवटिव करत असतात आम्ही त्याला भिक घालत नाहीत.
एक दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच नारायण राणेला जेल मध्ये घालून दाखवलं
चिपीची 934 एकर जमीन बायको आणि राजतेलीच्या नावावर हाॅटेल साठी 15 रूपयात घेत होते म्हणून आम्ही विरोध केला विमानतळाला नाही केला विरोध.
झारीतला शुक्राचार्य कसा वर येतो बघा तसा नारायण राणे आहे. केंद्रात मंत्री होऊन सिंधुदुर्गाचा भकास करण्याचे दिल्लीला जाऊन स्वप्न बघतो राणेंवर टिका
तुम्ही कितीही विरोध करा आम्ही मेलेल्या आईचे दुध पीलेलं नाही आम्ही तिघेही पुरून उरू तुम्हाला ग्वाही देतो.