*कोकण Express*
*▪️ग्रामपंचायत निगुडे व बँक ऑफ इंडिया शाखा, बांदा यांच्या वतीने साक्षरता शिबिराचे आयोजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत निगुडे व बँक ऑफ इंडिया शाखा, बांदा यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय, निगुडे या ठिकाणी वित्तीय साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ इंडिया पिंगुळी कुडाळ शाखेचे श्री ऋषिकेश गावडे (SKVK) श्री धैर्यशील( मार्केटिंग ऑफिसरAMO कुडाळ ) बांदा शाखा प्रभारी व्यवस्थापक श्रीम अश्विनी व श्रीम अल्पिता गाड(BC बँक ऑफ इंडिया, बांदा )निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामसेवक तनवी गवस, तलाठी भाग्यश्रीला शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य तुलसी रेडकर, किशोर जाधव, कृषीमित्र संजना गावडे, जानवी जाधव, राधाबाई नाईक, परेश गावडे, रोहिणी गावडे(CRP निगुडे) आदी उपस्थित होते यावेळी श्री धैर्यशील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व ग्रामपंचायती आभार मानले की या ठिकाणी ग्रामपंचायतीने प्रथमच असा या पंचक्रोशी मध्ये शिबीर आयोजन केलेला आहे की जो शेतकरी व सर्व सामान्य व्यक्ती ज्यांच्याजवळ बँक पोहोचू शकत नाही अशा माध्यमातून बँकेमार्फत येणाऱ्या अनेक योजना आपण गावातील जास्तीत जास्त लोकापर्यंत कसे पोचतील या उद्देशानेच हा शिबिर आयोजित केला आहे असे श्री धैर्यशील यांनी सांगितले व सदर कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया पिंगुळी शाखेचे व्यवस्थापकीय श्री ऋषिकेश गावडे यांनी मार्गदर्शन केले की गावातील शेतकऱ्यांना बँकेमार्फत जास्तीत जास्त कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल व त्यातून रोजगार कसा मिळेल या बद्दलची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली बँक ऑफ इंडिया कडे दुधाळ जनावरांसाठी तसेच घरबांधणीसाठी किसान घर घर दुरुस्ती साठी कर्ज कसे घेता येईल ते किती टक्क्याने शेतकऱ्यांना आम्ही देतो तसेच शेती पूरक लागणारी जी अवजारे आहे ती अवजारे त्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान या सर्व गोष्टी साठी लागणारे कमीत कमी कागदपत्रे यांची पूर्णपणे माहिती त्यांनी दिली व यापुढे आपल्या ग्रामपंचायती मार्फत व आमच्या बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने गावामध्ये एक मोठा शिबिर तुम्ही आयोजित करा जेणेकरून एकाच छताखाली कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल लागणारी कागदपत्रे यासाठी आम्ही आपल्या मदतीने गावातच शिबिर मोठा घेऊ व जास्तीत जास्त कर्ज कसे शेतकऱ्यांना देता येईल यासंदर्भात नियोजन करू असे आश्वासन श्री गावडे यांनी दिले यावेळी शेतकरीही उपस्थित होते निगुडे उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बँक ऑफ इंडिया च्या आभार मानले.