स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सरकारची घोषणा फसवी ठरली

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सरकारची घोषणा फसवी ठरली

*कोकण Express*

*▪️स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सरकारची घोषणा फसवी ठरली..*

*▪️परशुराम उपरकर यांचा टोला; होरपळून मृत्युमुखी पडण्यास सरकार जबाबदार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सावित्री नदीत अनेकांचे बळी गेले ,त्यानंतर सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सरकारने घोषणा केली.सरकारची ही घोषणा फसवी ठरली. नाटळ येथील मल्हार पूल कोसळले, मग ते ऑडिट कागदावरच झाले होते का?कोविड काळात अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानंतर रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी घोषणा राज्य सरकारने केली, त्याचे काय झाले?आता अहमदनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये आगीने अनेकांचे बळी गेल्यानंतर ५ लाखाची मदत जाहीर केली. मात्र होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाला मदत पण गेलेला जीव परत येणार आहे का?त्याला ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी केला. मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले,शासन जनतेला फसवत आहे.कोविड काळात अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागून लोकांचे जीव गेले होते,त्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते.तरीही हॉस्पिटलमध्ये लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.त्यांना ५ लाख दिले गेले,कुटुंब प्रमुख गेला ती उणीव भरुन निघत नाही.त्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिक ऑडिट झाले का? शासनाकडून घोषणा करून फसवलं जात असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. शेती नुकसान भरपाई ,तोक्ते वादळाचे अनेकांना अद्याप पैसे मिळाले नाहीत.रस्त्याची अवस्था काय आहे?खड्डेमय रस्ते आहेत. आमदार,खासदार घोषणा करत आहेत.अनेक कामगारांचे पगार मिळत नाहीत,अधिकाऱ्यांचे पगार मिळत नाही.एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे मिळत नाहीत.ग्रामीण भागात जाण्यासाठी एकमेव साधन एसटी लोकांना परवडणारे आहे.सत्तेवर आल्यानंतर काय करु? सत्ताधारी वचननामा विसरुन काम करताना दिसत आहेत.जनतेला न्याय देण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.त्यामुळेच नेते व कार्यकर्त्यांना जनतेने घोषणांचे काय झाले ?याचा जाब विचारला पाहिजे,असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!