*कोकण Express*
*कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरणाची खासदार विनायक राऊत यांनी केली पाहणी….*
*कुडाळ येथील ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊनच महामार्गाचे काम करणार असल्याचे दिले आश्वासन_*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरणाची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी केली. यावेळी कुडाळ येथील ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊनच येथील महामार्गाचे काम करण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळवासियांना दिले. यावेळी उपस्थित महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने महामार्गाचे काम करा चुकीच्या पद्धतीने नकाशे व काम खपवून घेणार नसल्याचे सांगितले.
कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात राज हॉटेल व आरएसएन हॉटेलबाबत अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाले आहेत. याबाबत येथील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविण्यास सुरूवात केली..
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले खासदार विनायक राऊत यांनी या दोन्ही ठिकाणांची पाहणी आज सायंकाळी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक।अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुनील भोगटे, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, संतोष शिरसाट, विकास कुडाळकर, अतुल बंगे, रुपेश पावस्कर, मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, राजु गवंडे, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, बांधकाम विभागाच्या अनामिका जाधव उपस्थित होते.
यावेळी येथील भुधारकांनी राज हॉटेलकडे करण्यात येणाऱ्या बॉक्सवेलचे काम हे चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना त्यांच्या घरी व दुकानांकडे जाण्यासाठी रस्ताच ठेवला नसल्याची तक्रार केली. सदर जागेची पाहणी करून खासदार राऊत यांनी येथील ग्रामस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे रस्ता करून द्यावा. त्यासाठी योग्य तो नकाशा बनवा असे आदेश अधिकारी व ठेकेदार यांना दिले.
यावेळी काही ग्रामस्थांनी हॉटेल आरएसएनकडे ठेवण्यात आलेल्या लेव्हल सर्कल कडून मोठी वाहने कशी जातील असा प्रश्न उपस्थित केला..यावेळी खासदार राऊत यांनीही अधिकाऱ्यांना सदरच्या मार्गावरून विमानतळाकडे वाहने जाणार आहेत.त्यामुळे येथील मार्गाचा योग्य तो नकाशा सादर करा, असे सांगितले. तसेच महामार्ग चौपदरीकरणात तोडलेल्या झाडाबाबतही योग्य