*कोकण Express*
*▪️८ नोव्हेंबर रोजी घावनळे येथे शिवसेना कुडाळ तालुक्याचा मेळावा*
शिवसेना कुडाळ तालुक्याचा तालुका मेळावा सोमवार दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता घावनळे येथे खा. मा. विनायकजी राऊत, पालकमंत्री मा. उदयजी सामंत, आमदार मा वैभवजी नाईक, संपर्क प्रमुख मा. अरुणभाई दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मा. सतीश सावंत, युवानेते मा. संदेश पारकर, जिल्हाप्रमुख मा. संजय पडते, जान्हवी सावंत, मंदार शिरसाट, नागेंद्र परब, विकास कुडाळकर, अतुल बंगे, अमरसेन सावंत, रुपेश पावसकर, जयभारत पालव,वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरेकर, श्रेया परब, मथुरा राऊळ, स्नेहा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच या मेळाव्यात घावणळे उपसरपंच श्री दिनेश वारंग यांचा पंचक्रोषीतील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रवेश होणार आहे.
तरी कुडाळ तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख श्री राजन नाईक व तालुका संघटक श्री बबन बोभाटे यांनी केले आहे.