मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*▪️मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन*

मनसे लॉटरी सेनेचे लोकप्रिय अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई, डोंबिवली, वसई व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मनसे लॉटरी सेनेचे कार्याध्यक्ष सुहास महाडिक, सरचिटणीस विनायक गोविलकर,चिटणीस संजय इंदप, सर्वेश ताठरे,संतोष चव्हाण, शंकर जाधव, मयुर नारकर,सिद्धांत जाधव स्वरा महाडीक, हर्शवी महाडीक, किशोर हेलगावकर यांनी महालक्ष्मी येथील वासल्या ट्रस्ट येथील निराधार मुलांना दिवाळी फराळ व चॉकलेटचे वाटप केले. मनसे लॉटरी सेनेचे सरचिटणीस कल्पेश सावंत व नालासोपारा विभाग संघटक प्रशांत पेंडुरकर यांनी वसईतील आदिवासी पाड्यात जाऊन मिठाईचे वाटप केले. मनसे लॉटरी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष नितीन पवार व देवगड मनसे लॉटरी सेनेचे उपतालुका अध्यक्ष रुपेश पांगम यांनी देवगड नाद पणकेवाडी येथे व कणकवली कोंडये गावात नितिन पवार व निलेश मेस्त्री यांच्या सौजन्याने अद्यावत सोलर लाईटचे लोकार्पण केले. डोंबिवली मनसे लॉटरी सेना अध्यक्ष भगवान मोरजकर यांनी डोंबिवलीतील वृद्धाश्रमात जाऊन सफरचंद , संत्री ,बिस्कीट आणि मिनरल वॉटर चे वाटप केले , या प्रसंगी मनसे विभाग अध्यक्ष हेमंत दाभोळकर माजी लॉटरी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सकपाळ, दिगंबर लिंगायत, पप्पु पाटील ,राजा चव्हाण आदि उपस्थित होते. मनसे लॉटरी सेनेचे चिटणीस व सिंधुदुर्ग उपसंपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांनी सांताकृझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप केले. मनसे लॉटरी सेनेचे देवगड तालुका अध्यक्ष अमित घाडी यांनी देवगड पोलीस स्थानक, ग्रामपंचायत कर्मचारी यांना दिवाळी फराळ वाटप केले.
मनसे लॉटरी सेनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांनी दिव्यांग व लहान मुलांना फळांचे वाटप केले.

अश्या प्रकारे मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित केल्या बद्दल मनसे लॉटरी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. सर्वांनी गणेश कदम यांना उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!