*कोकण Express*
*▪️तळेरे पंचक्रोशीला अवकाळी पावसाने झोडपले*
*▪️नुकसान झालेल्या भात पीकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत*
*▪️सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची आग्रही मागणी*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे पंचक्रोशीत गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊसाचे संकट कोसळल्याने तळेरे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तरी महसूल प्रशासनाने तातडीची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याची आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी तळेरे मंडळ अधिकारी तसेच कणकवली तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
दीपावली सणाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी असल्याने पंचनामे होण्यास उशीर होऊ नये.याबाबत तळेरे मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी यांचेकडून त्यांच्या अखत्यारीतील तलाठी सजांच्या ठिकाणी तातडीने भात पिकांच्या नुकसानीची आवश्यक ती पाहणी व चौकशी करण्यात यावी.तसेच त्यासंबंधी मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी यांच्याकडून त्यांच्या अखत्यारीतील तलाठी सजाणबाबत तातडीने आवश्यक तो आढावा घ्यावा. अवकाळी पावसामुळे तळेरे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत नियमोचित पद्धतीने पंचनामे तातडीने पूर्ण करावे व त्याअनुषंगाने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठ स्तरावरती तातडीने सादर करावा (या मागणीचे निवेदन दिवाळी सुट्टी असल्याने वाॅट्स अॅप द्वारे तहसील कणकवली व मंडल अधिकारि तळेरे यांना पाठवले असून सुट्टी संपताच त्याचा पाठपुरावा केला जाईल) अशी मागणी राजेश दिलीपकुमार जाधव यांनी केली आहे.