राज्य स्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेचे आयोजन, जेष्ठांनी सहभागी होण्याचे आवाहन

राज्य स्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेचे आयोजन, जेष्ठांनी सहभागी होण्याचे आवाहन

*कोकण Express*

*▪️राज्य स्तरीय मास्टर गेम्स स्पर्धेचे आयोजन, जेष्ठांनी सहभागी होण्याचे आवाहन*

*▪️अध्यक्ष मा.गे.अ.सिंधुदुर्ग अतुल रावराणे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र च्या वतीने मास्टर गेम्स चे आयोजन दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी इंदापूर पुणे येथे करण्यात आले असून प्रथमच आपल्या जिल्ह्यातील जेष्ठ खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे .
अँथलेटिक्स, कबड्डी, बॅडमिंटन, सायकलिंग, फुटबॉल, व्हाॅलिबाॅल, हॅन्डबाॅल, टेबल टेनिस, स्विमिंग, वेटलिफ्टटिंग, शूटिंग, हॉकी, बास्केटबॉल इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेतील खेळाचे वयोगट ३०+ ,३५+,४०+,४५+,५०+,५५+,६०+,६५+अँथलेटिक्स साठी व ३०+,४०+,५०+ सांघिक खेळांसाठी निश्चित करण्यात आले आहेत,राज्य मास्टर गेम्स असोसिएशनने नियुक्त केलेले जिल्हा सेक्रेटरी बायाजी बुराण यांनी स्पर्धेसाठी आॅनलाईन रजिस्ट्रेशन(नोंदणी) दि. १० नोव्हेंबर रोजी पर्यंत करावे व नोंदणी केलेल्या खेळाडूंनी जिल्हा असोसिएशनला संलग्न असणे गरजेचे आहे तरी खेळाडूंनी संपर्क साधावा नोंदणी केलेले खेळाडू जिल्हा असोसिएशन च्या शिफारशी नेच राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत तसेच जिल्हा मास्टर गेम्स असोसिएशन सिंधुदुर्गची स्थापना करण्यात अल्याचे ही त्यांनी सांगीतले व जिल्ह्यातील जेष्ठ खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून त्यांना खेळाचा आनंद मिळावा व आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले , जिल्ह्यात लवकरच जेष्ठांसाठीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी केले आहे व अधिक माहितीसाठी ९४२११४४६०५ या नंबर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!