*कोकण Express*
*मृत्यूशी झुंज देत असलेले अपघात ग्रस्त विजय जाधव यांचे निधन!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात वरवडे आरोग्य केंद्रचे आरोग्य सहाय्यक विजय जाधव हे जखमी झाले होते. गोवा-बांबोळी येथील जीएमसीमध्ये त्यांच्यावर उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कणकवलीहून जानवली ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहिमेसाठी येत असलेले वरवडे आरोग्य केंद्रचे आरोग्य सहाय्यक विजय जाधव आणि त्यांच्या मागे दुचाकिवर बसलेल्या आरोग्यसेविका नीलम गवाणकर यांना समोरून येणार्या कारची धडक बसल्याने दोघेजण जखमी झाले. जानवली ग्रामपंचायतच्या दिशेने वळत असताना समोरून गोव्याच्या दिशेने जाणार्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसली. या धडकेत आरोग्यसेवक जाधव आणि आरोग्यसेविका गवाणकर रस्त्यावर फेकल्या गेल्या होत्या. या अपघातात जाधव हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील जीएमसीमध्ये हलविण्यात आले होते.
याठिकाणी त्यांच्यावर उपचारसुरू असताना शुक्रवारी रात्री अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.