*कोकण Express*
*▪️आरोस येथे जय हनुमान मंडळा तर्फे भव्य दीपावली शोटाईम स्पर्धेचे 5 व 6 नोव्हेंबर रोजी आयोजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आरोस येथे जय हनुमान मंडळाने भव्य दीपावली शोटाईम स्पर्धेचे 5 व 6 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
दिपावलीचे औचित्य साधून जय हनुमान मित्र मंडळ यांनी स्थानिक कलाकारांना प्राधान्य मिळावे याकरिता दोन दिवसीय दीपावली शोटाइम या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे सदरचा महोत्सव हा 5 व 6 नोव्हेंबर असा दोन दिवस संपन्न होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी त सायंकाळी 7 वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून रात्री 8 वाजता दांडेली आरोस गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धा,खुल्या गटासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर हा पैठणीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी 6 रोजी सायंकाळी 7 वाजता मोठा व लहान गट अशा दोन गटांमध्ये वेशभूषा स्पर्धा, कराओके ही गाण्यांची स्पर्धा, दीपावली शो टाईम चे खास आकर्षण असलेली मिस दिपावली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याच बरोबर जय हनुमान दांडिया ग्रुपचा आकर्षक दांडिया नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहे. सदर चे कार्यक्रम आवाज बाजार दांडेली ग्रामपंचायत समोर होणार आहेत. तरी या सांस्कृतिक महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा. तसेच स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.